ब्रेकिंग! नितीश कुमार यांच्या हाती दहाव्यांदा बिहार, मंत्रिमंडळात कोण कोण?


बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.आज गांधी मैदानावर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १६ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा उपमुख्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत. मंत्रिमंडळात विजेंद्र प्रसाद यादव, विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, मदन साहनी आणि लेसी सिंह यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे.

बुधवारी झालेल्या एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पाचही पक्षांच्या आमदारांनी नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली.नवीन बिहार मंत्रिमंडळात भाजपाचे १६ आणि जनता दलाचे (यु) १४ मंत्री असून यात पक्षप्रमुखांचाही समावेश असेल. बिहारमध्ये एनडीएनं २४३ सदस्यांच्या विधानसभेत २०२ जागा जिंकत पुन्हा एकदा सत्ता मिळविली आहे. भाजपाला ८९, जेडी(यू) ८५, एलजेपीला (आरव्ही) १९, एचएएमला ५ आणि आरएलएमला ४ जागा मिळाल्या आहेत. या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!