मोठी बातमी! आचारसंहिता लागू, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा, समोर आली महत्वाची अपडेट…


. पुणे: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर चा हप्ता मिळणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असताना महत्त्वाची माहिती समोर आली आहे.परंतु लवकरच नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्हं आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार असून तीन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच महिलांना १५०० रुपये मिळण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.नोव्हेंबर महिना सुरु होऊन १९ दिवस उलटून गेले, तरी अद्याप नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.. परंतु लवकरच हे पैसे जमा केले जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर यापुढे संबंधित महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ईकेवायसी करताना वेबसाइटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!