लाडक्या बहिणी संकटात ; ‘या’ जिल्ह्यातील 95 हजार बहिणी ठरल्या अपात्र, यादीची तपासणी सुरू…


पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली. आता या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी सरकारने ई -केवायसी सुरू केली आहे.त्यानुसार योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील ९५ हजार लाडक्या बहिणी संकटात सापडल्या आहेत. अपात्र असल्याचे कारण देत त्यांना दर महिन्याला मिळणारे दीड हजार रुपयेही त्यांचे बंद करण्यात आले आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाला ही यादी प्राप्त झाली असून त्याची तपासणी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाभ मिळणाऱ्या आणि अचानक अपात्र ठरविल्या गेलेल्या अनेक बहिणींनी महिला व बालविकास विभागाकडे धाव घेतली आहे.
या योजनेतील पात्र, अपात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. कोण पात्र, कोण अपात्र याची छानणी करण्यात येत आहे. यातील ८ हजार ‘बहिणी’ अपात्र असल्याचे पुढे आले. उर्वरित अर्जांची तपासणी सुरू आहे. ज्यांच्याकडे कार नसतानाही यादीत नाव आले, त्यांची माहिती राज्य शासनाकडे दिली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान या योजनेतील इ केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ई-केवायसी करण्याची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचेही याआधी उघड झाले आहे. सरकारी महिला कर्मचारी, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिला, ६५ वर्षांवरील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुढे आले आहे. एका कुटुंबातील एकालाच लाभ मिळणे अपेक्षित आहे, मात्र हा नियमही पायदळी तुडविण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!