मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं, घरी मृतदेह येताच…, घटनेने महाराष्ट्र हादरला


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या अमानुष आणि क्रूर कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

तसेच १६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर गावातील शांतता पूर्णपणे ढवळून निघाली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले.

या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला. त्यावेळी एकच आक्रोश झाला.

प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विजय खैरनर आणि पीडित मुलीच्या वडिलांमध्ये सुमारे महिनाभरापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग आरोपीच्या मनात होता.

या रागातूनच त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही केस फास्टट्रॅक कोर्टात नेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रकरणाची सुनावणी प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्या मार्फत लढवली जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे.

या भयंकर घटनेनंतर संपूर्ण जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने या अमानुष घटनेचा निषेध करत मूक मोर्चा काढला. शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता. मोर्चादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!