मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार थेट जुन्या सहकाऱ्याच्या घरी….


वाघोली : भाजप आमदार श्रीकांत भारतीय हे एका कार्यक्रमानिमित्त पुणे येथे आले असता त्यांनी वाघोलीचे माजी उपसरपंच तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. विधानपरिषद आमदार असलेले श्रीकांत भारतीय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुण्याचे माजी संघटन मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. पुणे येथे संघटन मंत्री म्हणून काम पाहत असताना आमदार श्रीकांत भारतीय यांचे रामकृष्ण सातव यांच्याशी घनिष्ठ संबंध आले होते.

यातूनच वाघोलीचे रामकृष्ण सातव यांचा आमदार श्रीकांत भारतीय यांच्याशी जुना ऋणानुबंध आहे. त्यातूनच हि भेट झाल्याची माहिती आहे. आमदार श्रीकांत भारतीय हे त्यांच्या पत्नी डॉ. श्रेया भारतीय यांच्यासमवेत रामकृष्ण सातव पाटील यांच्या घरी आले.

सातव कुटुंबाकडून यांच्याकडून भारतीय कुटुंबाला स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत भाजप नेते स्वर्गीय गिरीज बापट व स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्यासमवेतच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा देण्यात आला. स्नेहभोजना नंतर आमदार श्रीकांत भारतीय सपत्नीक पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!