दिल्ली स्फोटप्रकरण अपडेट ; डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्यावर NIA चा छापा, तपासात धक्कादायक माहिती समोर..

दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी कारचा भीषण स्फ़ोट झाला. या कार स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून एनआयएने केलेल्या तपासात डॉक्टरांचे दहशतवादी जाळे उघड केले आहे. सहा राज्यांत मोठ्या प्रमाणावर छापेमारी करत १५ हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातून आणखीन काय धागेदोरे पुढे येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं तपास यंत्रणाकडून स्पष्ट करण्यात आले. या हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. कार स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थाकडून डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्यावर कारवाई करण्यात आली आहे. NIA ने सहा राज्यांमध्ये छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली या सहा राज्यात एनआयएने छापा टाकला आहे.यामध्ये डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्याला उघडकीस आणले आहे. व्हाईट कॉलर डॉक्टरांनी सोशल मीडिया ग्रुप्सद्वारे रेडिकलाइजेशन करून मोठ्या प्रमाणात दहशतवादी कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान या स्फोटामागे अल-फलाह मेडिकल कॉलेज, फरीदाबाद येथील डॉक्टरांचा दहशतवादी जाळे होते. या संबंधित असणाऱ्यांवर एनआयएने छापे टाकले आहेत. NIAने जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली या सहा राज्यांमध्ये छापे टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएआयने आतापर्यंत १५ पेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेतले आहे.तसेच तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी तीन 9mm काडतुसे जप्त केली आहेत. यामधील दोन काडतुसे जिंवत आहेत. गोळीबार करण्यासाठी वापरलेली पिस्तूल अद्याप सापडलेली नाही. धक्कादायक म्हणजे, ही काडतुसे सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यास परवानगी नाही. फक्त सुरक्षा दल आणि पोलिस अधिकारी याचा वापर करतात.ही काडतुसे मिळल्यानंत खळबळ उडाली असुन तपासाला आणखीन वेग आला आहे.
