कामाची बातमी! 15 नोव्हेंबरपासून टोल प्लाझावर होणार मोठा बदल! ‘ही’ चुक केल्यास दुप्पट पैसे भरावे लागणार, जाणून घ्या…


मुंबई : सध्या 15 नोव्हेंबर 2025 पासून टोल प्लाझावर एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल. तुमच्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा टॅग खराब झाला तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तसेच डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सरकारने मोठी सूट जाहीर केली आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

यामध्ये एखादा वाहनचालक वैध फास्टॅगशिवाय टोल प्लाझावर प्रवेश करतो आणि रोख रक्कम भरतो, तर त्यांच्याकडून दुप्पट टोल शुल्क आकारले जाईल. तसेच तोच चालक UPI किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमाचा वापर करून पैसे भरत असेल तर त्यांना टोल शुल्काच्या फक्त 1.25 पट जास्त पैसे द्यावे लागतील.

यामुळे आता वाहनचालकांना रोख रकमेपेक्षा डिजिटल पेमेंटद्वारे कमी पैसे द्यावे लागतील. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा केली आहे आणि नवीन नियम लागू केला आहे. यामुळे हा बदल केला आहे.

यामध्ये तुमच्या वाहनाचा टोल 100 रुपये आहे. जर FASTag काम करत असेल तर तो फक्त 100 रुपये असेल. जर FASTag फेल झाला आणि तुम्ही कॅशमध्ये पैसे भरले तर तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतील. मात्र FASTag फेल झाला आणि तुम्ही UPI वापरून पैसे भरले तर तुम्हाला 125 रुपये भरावे लागतील.

हा नियम टोल संकलन प्रणाली पारदर्शक करणे, रोख व्यवहार कमी करणे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की या निर्णयामुळे टोल प्लाझावरील लांब रांगा कमी होतील. यामुळे हे फायदेशीर ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!