बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, प्रकृतीबाबत महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना अलिकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वृत्तानुसार, सुरुवातीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीमुळे आता त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. वयानुसार त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत आलेल्या बातमीनंतर चाहत्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

दरम्यान, कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत काही गंभीर नसल्याचं सांगण्यात आलं होतं.
सध्या ८९ वर्षीय धर्मेंद्र वाढत्या वयानुसार येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. काही काळापूर्वी ते अमेरिकेत उपचारासाठीही गेले होते. आरोग्याबाबत ते नेहमीच जागरूक असतात आणि नियमित वैद्यकीय तपासणी करतात. मात्र, या वेळी आलेली प्रकृतीची बिघडलेली स्थिती पाहता त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.