भाजपाचे मंत्री विखे पाटलांच शेतकरी कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त विधान ; नव्या वादाला ठिणगी ?


पुणे : भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला ठिणगी पडली आहे. कर्जमाफीच्या मागणीवर भाष्य करताना” सोसायटीचे खर्च काढून पुन्हा कर्जबाजारी व्हायचे आणि त्यानंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे अनेक वर्ष चालू आहे” असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी आणि विविध पक्षाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

विखे- पाटलांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर सारवासारव करत आपले म्हणणे स्पष्ट केले. त्यावर ते म्हटले की, त्यांचे हे विधान ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर “हलक्याफुलक्या” पद्धतीने केलेले होते. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, त्यांच्या या विधानाची चुकीची व्याख्या केली गेल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे

दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर शेतकरी नेते अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया देत त्यांच वक्तव्य दुर्दैवी असल्याच म्हटल आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या मतासाठी आश्वासन देणे आणि अशा प्रकारे वागणे चालते मात्र सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करायची नसल्यामुळे सरकारकडून असे ओढेवेढे घेतले जात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या दबावामुळे सरकारला नाईलाजास्तव कर्जमाफी करावी लागत आहे. शेतकरी संघटनांची, नेत्यांची आणि शेतकऱ्यांची एकजूट झाली असल्यामुळे सरकारला झुकावे लागेल आणि कर्जमाफी करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!