पुणेकरांना आणखी एक भेट, मेट्रोनंतर निओ प्रकल्पासाठी हालचाली सुरू…!
पुणे : सध्या पुणे शहरात शहर वाहतूक बससेवा आहे. त्यानंतर आता मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोचे काही प्रकल्पही लवकरच पुर्ण होणार आहे. परंतु अजून एका वाहतूक सुविधेची भेट पुणेकरांना मिळणार आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
मेट्रोप्रमाणे निओ प्रकल्प पुणे शहरात तयार केला जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पुण्यात सध्या वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे.
याबाबत महामेट्रो कंपनीने निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. महामेट्रोने हा आराखडा महापालिकेला सादर केला आहे. आता लवकरच मनपा अधिकारी जागेची पाहणी करणार आहे.
सुमारे 44 कि.मी. लांबीच्या एचसीएमटीआर या एलिव्हेटेड वर्तुळाकार या प्रकल्पावर 1986 पासून चर्चा होत होती. परंतु आता हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5 हजार 192 कोटी रुपयांच्या या निविदा आहेत. हा निधी उभारण्यासाठी केंद्र शासनाची मदत मिळेल, असा विश्वास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यामुळे याबाबत प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.