ग्राहकांना दिलासा! सोन्याची किंमत पुन्हा घसरली, इतक झाले स्वस्त, किती आहे दर?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आता लग्नसराई सुरू झाल्या असताना सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.जळगाव, मुंबईपासून ते दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यापर्यंत सोन्याचे दर कमी जास्त होत आहे. आठवडाभरात २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ११६० रूपयांनी घसरण झाली आहे. तर २४ कॅरेटचे सोनं प्रति १० ग्रॅम ९८० रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे खरेदी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकनं फेडरल रिझर्व्ह बँकची वॅट अॅण्ड वॉच भूमिका, डॉलरचे दरात वाढ या कारणामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹1,22,170/10 इतके आहेत. तर 22 कॅरेटच्या सोन्याचे दर प्रति तोळा ₹1,12,000/ इतके आहेत. राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता अन् भोपाळ, लखनौमध्येही सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे.

भारतातील १० प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर

नवी दिल्ली: २४ कॅरेट – ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,१२,०००/१० ग्रॅम

मुंबई: २४ कॅरेट – ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,११,८५०/१० ग्रॅम

अहमदाबाद: २४ कॅरेट – ₹१,२२,०७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,११,९००/१० ग्रॅम

चेन्नई: २४ कॅरेट – ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,११,८५०/१० ग्रॅम

कोलकाता: २४ कॅरेट – ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,११,८५०/१० ग्रॅम

हैदराबाद: २४ कॅरेट – ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,११,८५०/१० ग्रॅम

जयपूर: २४ कॅरेट – ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,१२,०००/१० ग्रॅम

भोपाळ: २४ कॅरेट – ₹१,२२,०७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,११,९००/१० ग्रॅम

लखनौ : २४ कॅरेट – ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,१२,०००/१० ग्रॅम

चंदीगड: २४ कॅरेट – ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट – ₹१,१२,०००/१० ग्रॅम

दुसरीकडे चांदीच्या किंमतीमध्ये मात्र वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात चांदीची किंमत प्रति किलो ५०० रूपयांनी वाढली आहे. देशात चांदीची किंमत प्रति किलो ₹1,52,500 इतकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति औंस $48.48 इतकी झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!