मोठी बातमी! पार्थ पवारानंतर आता शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा जमीन घोटाळा ; 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली, वड्डेटीवारांचा गंभीर आरोप..


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कथित जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच आता शिंदे सेनेच्या मंत्र्याचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. काँग्रेस नेते आमदार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे. शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदरमध्ये 200 कोटींची जमीन अवघ्या 3 कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या या आरोपाने सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळा केल्याच्या आरोप केला आहे.ज्या जमिनीवर प्रताप सरनाईक यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आहे.ती जमीन मीरा भाईंदरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या जमिनीचा बाजारभाव 200 कोटी रुपये असून ती अवघ्या 3 कोटी रुपयांत सरनाईकांनी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का? आणि जर हे होऊ शकते तर महाराष्ट्र लुटून खा.. आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा….!असे म्हणायची वेळ आली आहे असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असताना जमीन घोटाळे उघडकीस येत आहेत. पार्थ पवारानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या जमीन घोटाळ्याचे आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता यावर पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!