मोठी बातमी! लाडक्या बहिणींना eKYc साठी मुदतवाढ मिळणार ;आदिती तटकरेंनीं सांगितली महत्त्वाची माहिती…

पुणे : महायुती सरकारकडून मोठ्या दणक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी आता सरकारकडून ई -केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.महिलांना केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. केवायसी केल्यानंतरच महिलांना पुढचा लाभ मिळणार आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ई -केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत.त्यामुळे आता केवायसीसाठी मुदतवाढ करण्याची मागणी महिलांनी केली आहे. यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८० लाख महिलांचे ई केवायसी पूर्ण झाली आहे.१८ नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांचे केवायसी होईल. तरीसुद्धा जर सर्व लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण झाले नसेल तर परिस्थिती पाहून निर्णय घेता येईल, असं मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं. त्यामुळे आता केवायसीची तारीख वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्याची सुविधा सुरु केली आहे. तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन केवायसी करायचे आहे. दरम्यान, या प्रक्रियेत अनेकांना अडचणी येत आहेत. अनेकदा वेबसाइट लोड होत नाही तर अनेकदा ओटीपी येत नाही. त्यामुळे सरकारने ही सुविधा अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी काही बदल केले आहेत. आता दिवसाला १० लाख महिला केवायसी करु शकतात.

दरम्यान ऑक्टोंबर च्या हप्त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला होता. त्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.