गोल्ड लोन करायचा विचार करतायं? तर ‘ही’ बातमी वाचा, होईल मोठा फायदा…

पुणे : गोल्ड लोन करायचा विचार करात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पैशांची तातडीची गरज भासल्यास गोल्ड लोन हा सर्वात सोपा आणि जलद उपाय मानला जातो. पर्सनल लोनपेक्षा कमी व्याजदर आणि सोपी प्रक्रिया असल्याने अनेक लोक या पर्यायाकडे वळतात.

जर तुम्हीही गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या बँकेत सर्वात कमी व्याजदर मिळतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. गोल्ड लोनमध्ये तुम्ही तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात कर्ज घेऊ शकता. सोन्याची किंमत, शुद्धता आणि वजन यावर तुमच्या कर्जाची रक्कम ठरवली जाते.
या कर्जावर व्याजदर कमी असतो आणि परतफेड कालावधीही लवचिक असतो. त्यामुळे वैद्यकीय, शैक्षणिक किंवा व्यवसायिक गरजांसाठी हे कर्ज उपयुक्त ठरते.

या बँकांकडून मिळेल सर्वात कमी व्याजदर…
१. पंजाब नॅशनल बँक – ग्राहकांना केवळ 8.35% व्याजदराने गोल्ड लोनची सुविधा मिळते. सरकारी बँक असल्यामुळे विश्वासार्हता आणि पारदर्शक प्रक्रिया हे याचे वैशिष्ट्य आहे.
२. इंडियन बँक आणि आयसीआयसीआय बँक – दोन्ही बँका त्यांच्या ग्राहकांना 8.75% व्याजदराने गोल्ड लोन देतात. या बँकांचा प्रतिसाद वेगवान असून डिजिटल पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देखील आहे.
३. कॅनरा बँक – कॅनरा बँक 8.95% व्याजदराने सुवर्ण कर्ज देते. कमी दस्तऐवजीकरण आणि त्वरित मंजुरीमुळे ग्रामीण भागातील लोकांसाठीही हा उत्तम पर्याय आहे.
४. कोटक महिंद्रा बँक – खासगी बँक असूनही 9% व्याजदराने गोल्ड लोन मिळते. शहरी ग्राहकांसाठी ही बँक वेगवान प्रक्रिया आणि सोपी ईएमआय सुविधा देते.
५. एचडीएफसी बँक – देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेकडून 9.30% व्याजदराने गोल्ड लोन मिळते. ग्राहकांच्या क्रेडिट प्रोफाइलनुसार व्याजदर थोडा बदलू शकतो.