पुणे रिंगरोडसाठी अजून ७४ गावांची आवश्यकता, जाणून घ्या MSRDC चा मेगाप्लॅन…

पुणे : रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नियोजन क्षेत्राचा विस्तार करण्याची जोरदार मागणी केली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये MSRDC ला रिंग रोडवरील ११७ गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता मिळाली होती.

तसेच आता MSRDC ने आणखी ७४ गावे आपल्या विशेष नियोजन क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी नगर विकास विभागाकडे केली आहे. MSRDC चे व्यवस्थापकीय संचालकांनी नगर विकास विभागाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.
दरम्यान, या मागणीमुळे MSRDC च्या नियोजन क्षेत्राचा परिसर ६६८ चौरस किलोमीटरवरून वाढून तब्बल १,०६२ चौरस किलोमीटरवर पोहोचणार आहे

MSRDC ने ज्या ७४ गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे, त्यापैकी काही गावे खालीलप्रमाणे आहेत…
हवेली: रामनगर, कोंढाणपूर, खेड शिवापूर. भोर – किकवी, ससेवाडी, नसरापूर, शिवरे, वरवे बुद्रुक. पुरंदर- दिवे, सोनोरी, जाधववाडी, कुंभारवळण, आंबोडी.
मुळशी – पिरंगुट, अंबडवेत, पौड, आंबेगाव, भुकूम. वेल्हे- कोंडगाव, आंबवणे, लाशीरगाव, विंजर. एकात्मिक विकासासाठी ७४ गावांचा आग्रह
MSRDC ने हवेली, भोर, पुरंदर, मुळशी आणि वेल्हे (राजगड) या पाच तालुक्यांतील 74 गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. रिंग रोडच्या संपूर्ण पट्ट्याचे नियोजन एकात्मिक आणि समन्वित पद्धतीने करण्यासाठी हा विस्तार अत्यावश्यक असल्याचे MSRDC चे म्हणणे आहे..