ठाकरेंची मुलुख मैदान तोफ संजय राऊतांनी रुग्णालयातून शेअर केला पहिला फोटो, पण……


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची मुलुख मैदान तोफ असणारे संजय राऊत सध्या प्रकृती बिघाड झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात आहेत. भांडूपमधील फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत. त्यातच आता संजय राऊत यांनी रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे.

ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत संजय राऊत हे रुग्णालयातील बेडवर रुग्णाचे कपडे घालून बसल्याची झलक दिसत आहे. यावेळी त्यांच्या हातावर सलाईन लावली आहे. तसेच ते एक पेपर आणि पेन हातात धरुन लिहित असल्याचे दिसत आहेत. या पेपरवर एडिट असे लिहिलेल असल्याने अनेकजण ते सामनाचा अग्रलेख लिहित असावे असा अंदाज बांधत आहेत.मात्र राऊत यांनी हे ट्वीट करत त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता! असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत. सध्या त्यांन पुढील उपचारांसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले आहेत. वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यावर ते विश्रांतीसाठी आपल्या मैत्री निवास्थानी परतणार असल्याची माहिती समोर आली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!