भाजपला मोठा धक्का! जिल्हाध्यक्षांचा निवडणुकीच्या तोंडावर तडकाफडकी राजीनामा तर लेकीची नगराध्यक्ष पदाची तयारी


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.दुसरीकडे राजेश सावंत यांची लेक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संभाव्य नगराध्यक्षपदाची उमेदवार असल्याने नैतिकता पाळून आपण राजीनामा देत असल्याचे राजेश सावंत यांनी सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी युती आघाड्यांच्या चर्चा अंतिम टप्प्यात असून असून राजकीय नेते आगामी राजकारणातील संधी लक्षात घेऊन पुढील निर्णय घेत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्याचे संकेत खुद्द मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. अशातच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजेश सावंत यांची लेक शिवानी सावंत माने ही उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांची सून आहे. शिवानी सावंत माने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून ती निवडणुकीला उभी राहत असल्यामुळे युतीच्या बैठकीला आपण उपस्थित राहू शकत नाही. जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे सावंत म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!