सर्वात मोठी बातमी! राज्यात आचारसंहिता लागू, आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा..

मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

तसेच या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर…
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
नामनिर्देशन दाखल: 10 नोव्हेंबर 2025
नामनिर्देशनाची अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर 2025
छाननी: 18 नोव्हेंबर 2025
अर्ज माघारी घेण्याची तारीख: 21 नोव्हेंबर 2025
निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर 2025
मतदानाचा दिवस: 2 डिसेंबर 2025
मतमोजणीचा दिवस: 3 डिसेंबर 2025
या सर्व निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येणार आहेत. नगर परिषदेच्या प्रत्येक वॉर्डात दोन किंवा तीन जागांसाठी मतदान होईल.