मुंबई विमानतळावर दुर्देवी घटना ; 25 फूट उंचीवरून कर्मचारी कोसळला, जागीच मृत्यू


मुंबई : मुंबई विमानतळावर एका ३० वर्षीय कर्मचाऱ्याचा 25 फूट उंचीवरून खाली कोसळल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा कर्मचारी विमानतळावर कन्व्हेयर बेल्ट तपासत असताना जोरदार खाली कोसळला.पोलिसांनी या प्रकरणी अपघाती नोंद केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, विमानतळावर काम काम करणाऱ्या त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव दुर्गेश पांडे असे नाव आहे. तो अंधेरी पूर्वे भागात राहात होता. तो आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत होता. तो मामा सुजित कुमार ओझा यांच्या मालकीच्या प्रभात असोसिएट्स स्टोअरमध्ये टेक्निकल सुपरवायधर म्हणून काम करत होता. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४:४५ वाजता अपघात झाला. दुर्गेश हा सहकारी दिलीपकुमार सरन यांच्यासोबत बेल्ट मार्ग तपासणीचे काम करत होता. त्यासाठी लेव्हल २ वरील फॉल्स सीलिंगवर गेला होता. तपासणी करत असताना दुर्गेश पांडे याचा २५ फूट उंचीवरून तोल गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ विले पार्ले (पश्चिम) येथील नानावटी रुग्णालयात दाखल गेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान त्याला डॉक्टरांकडून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण दुखापत गंभीर असल्याने त्याचा जीव गेला. सहारा पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!