केतुर गणातून विनोद बाबर किंवा संजय फरतडे यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळावी- किरणकुमार जाधव


करमाळा : सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वत्र उमेदवारीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. करमाळा तालुक्यात सध्या पाटील गट, शिंदे गट व बागल गट हे तीन गट सक्षम आहेत. अजून पर्यंत कोणत्याही गटाने आपले उमेदवार चे नाव निचीत केले नहीत.

गावपातळीवर आजपर्यंत पं.समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल यामध्ये छोट्या गावांना कधी सुधा संधी मिळाली नाही. राजकारणामध्ये आपले विचार तसेच काम करण्याची संधी प.समिती मार्फत भेटू शकतो. पं.समिती चा उमेदवार निवडताना त्याच्या गावाचा किंवा मतदानाचा आकडा बघून उमेदवारी जाहीर न करता त्या व्यक्तीने आपल्या गटासाठी किंवा पार्टीसाठी कशा पद्धतीने आजपर्यंत काम केलंय, असे किरणकुमार जाधव यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, सोशल मीडियाद्वारे असेल किंवा घरोघरी जाऊन थेट कामाबद्दल माहिती देयच काम असेल, अश्या पद्धतीने तुम्ही उमेदवारी जाहीर केली पाहिजे.
आपल्या भागांमधे खूप असे सर्व सामान्य नेतृत्व आहेत जे आपल्या आपल्या पार्टी चे खूप मनापासून काम करत असतात, सोशल मीडिया च्या माध्यमातून सर्व माहिती गावा गावामधे पोहचवण्याचे काम करत असतात.

त्यामुळे जिल्हा परिषदेचं उमेदवरीचा विचार वरिष्ठांनी करावा पण प.समिती च उमेदवारीच विचार हा कार्यकर्त्याच्या मनाने करावा. आजपर्यंत १० वर्षांपासून विधानसभा असेल, जि.परिषद असेल, पंचायत समिती असेल, कारखाना असेल सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील यामधे सर्वसामान्य कार्यकर्ता सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उपाशी पोटी पर्यवेक्षण करत असतो, आणि १००% मतदान कसं करतां येईल याचा विचार करत असतो.

त्यामधे त्याचा वैयक्तिक स्वार्थ काही नसून फक्त गटाचे काम प्रामाणिकपणे करणे हा एकमेव उद्देश असतो. जर अश्या कार्यकर्त्याच्या गाव छोट आहे किंवा गावाची मतदान संख्या कमी आहे म्हणून जर पात्र कार्यकर्त्याला उमेदवारीपासून वंचित राहावं लागतं असेल तर मग या लोकांना संधी कधी भेटणार. पश्चिम भागांमधे जर विचार केला तर नारायण आबांच्या माध्यमातुन चांगला विकास झालेला आहे, त्यामुळे लोकांना नारायण आबांवर विश्वास बसलेला आहे.

तुम्ही जर फक्त वरिष्ठ नेत्यांसोबत बसणे उठणे असणाऱ्या लोकांना उमेदवारी देणार असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही गटासाठी व पार्टीसाठी मनापासून काम करणाऱ्याला उमेदवारी केत्तुर गणामधे द्यावी अशी सर्व सर्वसामान्य लोकांची व तरुण वर्गाची इच्छा आहे. केतुर गनामधे विचार केला तर पार्टीसाठी मनापासून काम करत असतील तर हिंगणी गावचे विनोद बाबर असतील.

पोमलवांडीचे संजय फरतडे असतील, भगतवाडीमद्ये सुद्धा अजून खूप सारे कार्यकर्ते असून गुलमोहरवाडी, भिलारवडी, टाकळी असे खूप सारी गावे आहेत की त्या ठिकाणी गावच मतदान कमी आहे आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी कधी भेटली नाही. केतूर गनामधे यावेळी विनोद बाबर किंवा संजय फरतडे यांना उमेदवारी द्यावी अशी सर्वांची इच्छा आहे. जर यांना उमेदवारी का द्यावी असा जर प्रश्न पडत असेल तर या लोकांना केत्तूर गणामधील सर्व गावांचा अभ्यास आहे.

तसेच प्रत्येक गावामधे संबंध असून काम करण्याची धमक व वर्चस्व आहे. या लोकांमधे राजकीय घमंड नसून त्यांना माहिती आहे की गावपातळीवर कशाप्रकारे तुम्ही काम करू शकता. जर दुसऱ्यांसाठी ते दिवसरात्र मेहनत घेत असतील तर ते स्वतः साठी काय काय करू शकतील हे सांगायची गरज नाहीये. याबाबत वरिष्ठांनी सकारात्मक विचार करावा. असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!