मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी, इतक्या अंगठ्या आणि रोख केली लंपास…

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मध्यरात्री चोरट्यांनी धाड टाकली आहे. घरातील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील कपाटे उघडली

पहाटे घरकामगार साफसफाईसाठी आल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरकामगार साफसफा करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
दिवाळीनिमित्त एकनाथ खडसे हे बाहेरगावी होते. त्यांच्या या घरात एक सुरक्षारक्षक असतो. पण तोही सुट्टीवर होता. ही संधी साधत चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व कपाटं उचकलीत. सामान अस्तव्यस्त केले.

त्यांनी ५ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम लांबवल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी अशी माहिती दिली आहे. तर रक्षा खडसे यांच्या खोलीतही त्यांनी प्रवेश केला आणि चोरी केल्याचे समोर आले आहे.
या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर काही गोष्टींची जुळवाजुळव पोलिस अधिकारांकडून केले जात आहे. तळमजल्यावरील खोल्या तसेच पहिल्या मजलावरील खोल्यांमधील कपाटे तोडून त्यातील मुद्देमाल चोरून नेला आहे. याच घरामध्ये रक्षाताई खडसे यांचे देखील खुले असेल त्यांच्या खोलीतील देखील कपाटांचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर शहरांमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाचा जळगाव मध्ये एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.