सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता सुरेश धसांची एण्ट्री; काय केली मोठी मागणी?


सातारा : सातारा जिल्ह्यातील तरुण महिला डॉक्टर संपदा मुंडेच्या आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.आता याप्रकरणी आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी आणि खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले आमदार सुरेश धस?

संपदा मुंडे या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना फासावर लटकवल पाहिजे. मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए असोत.आई-वडिलांनी तीन एकर जमिनीवर लेकीला डॉक्टर बनवलं होतं. तिच्या तक्रारीची दखल न घेणारे जो कोणी अधिकारी असतील, त्या सर्वांना आरोपी केलं पाहिजे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिच्या कुटुंबीयांच्या बाजूने उभे राहू असं ते म्हणाले.हा खटला फास्टट्रॅक कोर्टात लढवला पाहिजे, अशीही मागणी धस यांनी केली. त्याचप्रमाणे एसआयटीकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी संपदा मुंडे या महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तळहातावर सुसाईड नोट लिहून पोलीस अधिकाऱ्यावर शारीरिक छळाचा आरोप केला. ‘पीएसआय गोपाळ बदाणे यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी माझा मानसिक छळ केला’, असा मजकूर डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेला आढळला. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल आहे. या आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीवर लटकवले पाहिजे अशी मागणी आता आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे लागेबांधे, पोलीस अधिकाऱ्यांची कथित भूमिका आणि तपासात होणारा विलंब पाहता, प्रशासनावर तातडीने कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे. बीडच्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!