मोठी बातमी! ऐन दिवाळीत तब्बल 90 अधिकाऱ्यांच्या बदल्या? प्रशासकीय वर्तुळात खळबळ…

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता ऐन दिवाळीच्या धामधुमीत तब्बल 90 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे.

राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या आठवड्यात अपर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे. गृहविभागाने त्यासंदर्भातील तयारी पूर्ण केली असून, पात्र अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.

या बदल्यांमध्ये मुंबई पोलीस आयुक्तालय, एसीबी मुख्यालय, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, सायबर सेल, सुरक्षा विभाग, फोर्स वन, मिरा-भाईंदर आणि ठाणे-पलास विभागांतील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. एकूण 90 उच्चपदस्थ अधिकारी, त्यात 58 ते 60 पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाचे अधिकारी यांचे बदल्यांचे आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. या बदल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

