भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, राहुरी मतदारसंघात शोककळा..


पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे देखील होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहीत पवार यांनी एक्स (X) वरून माहिती दिली आहे. आमदार कर्डीले यांच्या अकाली जाण्यानं त्यांचं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीराव कर्डिले यांचे शुक्रवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. या दुःख घटनेनंतर राहुरी मतदार संघावर शोककळा पसरली आहे. सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता.

भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा संघर्षमय प्रवास…

       

डेअरी व्यवसायातून राजकारणात पाऊल टाकत लोकांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या शिवाजीराव कर्डीले यांचा प्रवास संघर्षमय पण प्रेरणादायी राहिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लहानाचे मोठे झालेले कर्डीले यांनी माध्यमिक शिक्षणानंतर शैक्षणिक वाट सोडून व्यवसायाच्या मार्गावर पाऊल ठेवले. त्यांनी डेअरी उद्योग उभारला आणि स्थानिक पातळीवर दमदार ओळख निर्माण केली. याच ओळखीच्या बळावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
भाजपकडून निवडणूक लढवत त्यांनी राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. ग्रामीण भागातील विकास, शेतीतील अडचणी आणि डेअरी क्षेत्रातील प्रश्न मांडत ते जनतेच्या मनात स्थान निर्माण करू लागले. त्यांच्या कारकिर्दीत ‘शेतकरी आणि ग्रामविकास’ हे केंद्रबिंदू राहिले.

दरम्यान मागील अनेक दिवसापासून कर्डिले यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत होती. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्ता तनपुरे यांचा मोठ्या फरकाने विजयामुळे पुन्हा विधानसभेत एन्ट्री केली होती.विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कर्डिले यांना मंत्रिपद विस्तारामध्ये मंत्रिमंद मिळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.मात्र त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल नाही मात्र जिल्हा सहकारी बँकेत ते चेअरमन राहिले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!