नागपूरमध्ये भयंकर प्रकार! सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आळीपाळीने लोक यायचे अन्…


नागपूर : नागपूर शहरातील एका शांत निवासी भागात सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. येथील प्रमीला प्रकाश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले. पोलिसांनी येथून तीन मुलींना सुरक्षितपणे वाचवले आहे. पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. या सेक्स रॅकेट कसे उघडकीस आहे.

पोलिसांनी या प्रकरणाविषयी सांगितले की, या रॅकेटचे संचालक तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवत होते आणि त्यांच्याकडून देहविक्री करवून घेत होते. यामागे कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला हे दोन मुख्य आरोपी असून, त्यांना पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली आहे.पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये तपासणी केली. बनावट ग्राहक तिथे पोहोचताच संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.

बनावट ग्राहकाने हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तेथील लोकांसोबत संभाषण केले. त्यावेळी हॉटेल संचालकांचे सर्व कृत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढले. नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सांगितले की, ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

       

गेल्या काही महिन्यांपासून शहरात मानव तस्करी आणि सेक्स रॅकेटविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.या छाप्यात हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि इतर पुरावेही पोलिसांनी जप्त केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण रॅकेटचे नेटवर्क उघड होईल.

दरम्यान, पोलिसांचे म्हणणे आहे की, शहरातील कोणत्याही भागात आता बेकायदेशीर कामे खपवून घेतली जाणार नाहीत. या छाप्यातून हेही समोर आले की, रॅकेट संचालक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलींना सहजपणे फसवतात आणि त्यांच्यावर दबाव टाकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!