अजित पवार चेअरमन असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अंतिम दर ३४५० रुपये जाहीर….

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेला पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असा माळेगाव सहकारी साखर कारखाना याने २०२४-२५ या मागील गळीत हंगामासाठी ३४५० रुपये प्रति टन असा अंतिम दर जाहीर करण्यात आला. अजित पवार स्वतः या कारखान्याचे अध्यक्ष असल्याने याकडे राज्यातील कारखान्यांचे लक्ष लागले होते.

या निर्णयामुळे आता हा दर इतर कारखान्यांच्या तुलनेत कमीच असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. दरम्यान, या अगोदर सभासदांच्या खात्यावर ३३३२ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच वर्ग केली जाणार आहे. दिवाळीच्या आधीच पैसे आल्याने सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तसेच यामध्ये गेटकेनधारक शेतकऱ्यांना त्यांना ३२०० रुपये प्रति टन असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच खोडवा अनुदान स्वरूपात १५० रुपये प्रति टन अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे. कारखाण्याची परिस्थिती चांगली आहे.

यामुळे दर अजून देता आला असता असेही अनेक शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या कारखाण्याच्या निवडणुकीत अजित पवार हे स्वतः उतरले होते. त्यांनी विजय मिळवला होता. ही निवडणूक मोठी चुरशीची केली होती. या निवडीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
