राज्यातील पावसाबाबत मोठी बातमी, आजपासून ‘असे’ असणार हवामान, शेतकऱ्यांना दिलासा…!


पुणे : सध्या राज्यात अवकाळी पाऊस कमी होत असून, सोमवारपासून पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. 13 एप्रिलपर्यंत राज्यात तुरळक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

 

यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र आजपासून हवामान बदलणार आहे.

 

आजपासून राज्यातील मोठा पाऊस थांबत आहे. अजूनही विदर्भ ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भातील काही भागांत हलका पाऊस होईल, मात्र राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

 

पुणे शहरात शहरात वादळीवार्‍यासह पाऊस झाला. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. सायंकाळी 6 पर्यंत शहरात सरासरी 4 ते 8 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. यामुळे शेतकरी देखील चिंतेत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!