कोल्हापूरच्या बड्या नेत्याला तरुणीकडून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न ; अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्…,


कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून अनेक उद्योगपती आणि विविध पक्षातील राजकारण्यांना हनी ट्रम्पचा फटका बसला आहे. त्यातच आता कोल्हापूर येथील चंदगडचे भाजपाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा एका महिलेनं प्रयत्न केलाकेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,कोल्हापूर येथील चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना मागील अनेक दिवसांपासून सदरची महिला वेगवेगळ्या फोन वरून मेसेज आणि फोटो पाठवत होती.सुरुवातीला साध्या चॅटिंगने संवाद सुरू झाला, त्यानंतर त्या महिलेने पाटील यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. हळूहळू संवाद वाढत गेल्यानंतर तिने काही तरुणींचे अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली. तिने शिवाजी पाटील यांच्याकडे 10 लाखाची खंडणी मागितली. शिवाजी पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चितळसर पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

काही काळानंतर पाटील यांनी महिलेचा त्रास वाढल्यामुळे त्या महिलेला ब्लॉक केले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील फोटो आणि संदेश पाठवले. पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली.या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या आमदार पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

       

दरम्यान पोलिसांनी सदर प्रकरणात आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, प्राथमिक तपासात हा सायबर हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!