पुण्यात गुंडांची दहशत ; 12 – 15 जणांच्या टोळीचा कोयत्यांनी रस्त्यावर राडा, वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

पुणे : पुण्यातील येरवडा परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारी आणि दहशतीच्या छायेत सापडला आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीनगर भागात तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने अक्षरश: रस्त्यावर हातात कोयते, तलवारी,काट्या घेऊन धुमाकूळ घातला आहे.यानंतर आरडा-ओरडा करत, धमक्या देत आणि वाहनांची तोडफोड केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,येरवडा परिसरात या टोळक्याने परिसरातील अनेक दुचाकी, चार चाकी आणि दुकानावर दगडफेक केली तर काही ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडल्या.त्या सर्वांच्या हातात कोयते, तलवारी अशी धारदार शस्त्र होते. ती शस्त्र पाहून घाबरलेल्या नागरिकांनी भीतीपोटी घराचे दरवाजे बंद करून स्वतःचा जीव वाचवला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखा युनिट चार आणि स्थानिक गस्तीपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमाव बंगला आणि परिसरात गस्त वाढवलं.

दरम्यान पोलिसांनी काही संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेतल असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

