पुणेकरांनो लक्ष द्या! गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये आवश्यक विद्युत व स्थापत्यविषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच या कामांमुळे शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने सुरू होईल. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आणि आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पर्वती एमएलआर टाकी अंतर्गत येणारे भाग: गुलटेकडी, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट रस्ता परिसर, गंज पेठ , भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर.

पर्वती एचएलआर टाकी अंतर्गत येणारे भाग: सहकारनगर, पद्मावती , बिबवेवाडी, मुकुंदनगरचा भाग, महर्षीनगर, गंगाधाम , चिंतामणीनगर (भाग १ व २), लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर व लोअर इंदिरानगर , ढोले मळा, सॅलिसबरी पार्क , गिरिधर भवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्यदय नगर, शिवनेरीनगर, मिठानगर , कुमार पृथ्वी सर्वे क्र. ४२, कोंढवा खुर्द, साईबाबानगर.

पर्वती एलएलआर टाकी अंतर्गत येणारे भाग: शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर , डेक्कन परिसर शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर ते खराडी परिसरातील पाणीपुरवठा खंडित..
लष्कर जलकेंद्र भाग: संपूर्ण रामटेकडी औद्योगिक क्षेत्र, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी गोंधळेनगर, ससाणेनगर काळेपडळ, मुंढवा , माळवाडी , सोलापूर रस्ता डावी बाजू, केशवनगर , मांजरी बुद्रूक , शेवाळवाडी , बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर , बालाजीनगर , विकासनगर, कोरेगाव पार्क ओरिएंट गार्डन , साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवी बाजू , संपूर्ण हांडेवाडी रस्ता , फुरसुंगी उरुळी देवाची, भेकराईनगर (टँकरद्वारे पाणी बंद) हाय सर्व्हिस , बेकर हिल, रेसकोर्स , ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून.