मोठी बातमी! निलेश घायवळच्या घरी पोलिसांचा छापा, हादरवणाऱ्या गोष्टी लागल्या हाती…


पुणे : पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने गुंड निलेश घायवळच्या कोथरूडसह पुण्यातील विविध ठिकाणांवरील घरांवर मोठी छापेमारी मोहीम राबवली. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून याबाबत सध्या तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी बंदुकीच्या जिवंत गोळ्या, रिकामे पुंगळे, महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

तसेच घायवळच्या मालकीच्या मालमत्तांचे सातबारे, साठेखत, मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाइल्स सापडल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याचे समोर आले होते. यामुळे आता तो अजूनच अडचणीत सापडला आहे. सध्या तो पोलिसांना फसवून परदेशात पळाला आहे.

दरम्यान, अनधिकृत मालमत्ता आणि थकीत कर असलेल्या संपत्तीवर सील आणि जप्तीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. मनपाचे पथक लवकरच प्रत्यक्ष कारवाईसाठी मैदानात उतरणार आहे. या प्रक्रियेला सध्या वेग आला आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून विदेशात पलायन केले आहे. या प्रकरणावरून पुणे पोलीस आयुक्तालयाने त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

       

त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने खोटा पत्ता नाव वापरून पासपोर्ट मिळवला आहे. पोलिसांनी त्याच्या नावावरील बँक खाती गोठवण्याचे आणि बेकायदा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे त्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, त्याच्याकडे सापडलेले कारतूस व पुंगळे यांचा कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नाही. त्यामुळे शस्त्रास्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत त्याला राजकीय बळ मिळाले असल्याचे देखील बोलले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!