मोठी बातमी!अपघातावेळी गौतमी पाटीलच्या गाडीत होता मोठा अधिकारी, रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांचा खळबळजनक दावा


पुणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या गाडीने एका रिक्षा चालकाला धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी आहे. सध्या रिक्षा चालकावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी गौतमीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच अपघातावेळी गाडीत कोणी तरी मोठा अधिकारी असल्याचा संशय जखमी व्यक्ती समाजी मरगळे यांची मुलगी अर्पणा मरगळे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक भागात एका कारने रिक्षाला धडक दिली. ही कार प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मालकीची होती.या धडकेत रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झाला. पण कार चालक मात्र तेथून पळून गेला. आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. जखमीच्या कुटुंबातील एका व्यक्तीने अपघातावेळी गाडीमध्ये मोठा अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे.तसेच जखमी रिक्षा चालकाच्या मुलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने, ‘पोलीस मॅनेज झाले आहेत. पोलीस गौतमी पाटीलला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत’ असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखीन वेगळ वळण लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पोलिसांनी नृत्यांगना गौतमी पाटीलला जबाब देण्यासाठी नोटीस पाठवली असून हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या रात्री अपघात घडला त्या वेळचं CCTV फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलं असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्या फुटेजमध्ये काय सापडतं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. त्यामध्ये कोणी अधिकारी खरच गाडीमध्ये होता का? हे स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!