पुण्यात ११ वर्षीय मुलगा खेळता-खेळता लिफ्टमध्ये अडकला अन् क्षणात झालं होत्याच नव्हतं, घडलं भयंकर…


पुणे : पिंपरी चिंचवडच्या चोवीसावाडी येथे अमेय फडतरे या अकरा वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आता पोलिकांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

आता पोलिकांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणात तांत्रिक तपास सुरू असून लिफ्ट मध्ये काही दोष असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, अमेय हा लिफ्ट सोबत खेळत होता. तो जिन्याने वर जायचा आणि लिफ्टने खाली यायचा. काही वेळ हा खेळ सुरु होता. मात्र खेळत असताना लिफ्टच्या दरवाजाच्या मधल्या जागेत अमेय अडकला व तो गंभीर जखमी झाला.

तो जखमी अवस्थेत बराच काळ मदतीसाठी ओरडत होता, मात्र त्याला वेळेवर मदत मिळाली नाही. अमेय लिफ्टमध्ये अडकला आहे हे लवकर कुणाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्याला मदत मिळण्यात उशीर झाला.

अमेय लिफ्टमध्ये अडकल्याचे लक्षात येताच ही माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमनच्या जवानांनी अमेयला बाहेर काढले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान अमेयचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बऱ्याच काळापासून अमेय लिफ्टमध्ये अडकला होता, त्याला वेळेवर मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता अशी माहिती अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लिफ्टचे अपघात नेहमी होत असतात. अशा घटना टाळण्यासाठी लिफ्टचा मेंटेनन्स वेळोवेळी करावा. तसेच मेंटेनन्स वेळेत केला असला तरी लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये सोडू नये. तसेच लहान मुले लिफ्टमध्ये अडकल्यास काय खबरदारी घ्यावी, याची जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी सोसायटीसह पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!