शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला ; महायुतीच्या नेत्यानेच दिली सुपारी, गाडी अडवून बेदम….


सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या हल्ल्यात शिवसेना नेते जखमी झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्यांच्या या हल्ल्यासाठी महायुतीच्या नेत्यांनीच सुपारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महेश चिवटे असं हल्ला झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव आहे. ते शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे माजी स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. आज सकाळी महेश चिवटे आपल्या शेतात एकटे गेले होते. ते परत येत असताना त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.या हल्ल्यानंतर चिवटे यांनी दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांच्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनीच सुपारी देऊन हा हल्ला केल्याचा आरोप चिवटे यांनी केला. दिग्विजय बागल हे माजी दिवंगत मंत्री दिगंबर बागल यांचे पुत्र आहेत.

विशेष म्हणजे चिवटे यांनी ज्यांच्यावर आरोप केला, ते रश्मी आणि दिग्विजय बागल सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. यांनीच कथितपणे चिवटे यांच्यावर हल्ला केल्याने शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसापूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलीस तक्रार दिली होती. त्यानंतर झालेल्या हल्ल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!