आधार कार्ड अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या..


पुणे : आजच्या डिजिटल युगात जवळपास सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्या जात आहेत. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा मग बँक खात्यासंबंधित कामं असेल, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणं महत्वाचं आहे.

तसेच मधल्या काळात सरकारने सगळ्यांना आधार अपडेट करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आधारकार्डशी संबंधित घडणारे कोणतेही बदल तुम्हाला करणे महत्वाचे आहे.

१ ऑक्टोबरपासून आधार दुरुस्तीसाठी नवीन दर लागू…

आता तुम्हाला आधारमधील माहितीमध्ये काही बदल किंवा दुरुस्ती करायची असल्यास अधिक किंमत मोजावी लागणार आहे. यूआयडीएआयने 1 ऑक्टोबरपासून आधार दुरुस्तीसाठी नवीन दर लागू केले आहेत. हे दर १ ऑक्टोबर पासून लागू झालेले असून तर 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहणार आहेत.

हे शुल्क फक्त नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग म्हणजेच बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी लागू होणार आहे. लहान मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत राहील. तुम्हाला जर डेमोग्राफिक माहिती म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल यासारख्या माहितीत बदल करायचा असेल तर आधी 50 रुपये शुल्क होते जे बदलून आता ७५ झाले आहे.

जर हे सगळे अपडेट बायोमेट्रिक अपडेटसोबत करायचे असतील तरीही हीच किंमत राहील. तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. तसेच बायोमेट्रिक अपडेटसाठी म्हणजेच बोटांचे ठसे, आयरिस स्कॅनसाठी १२५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

कागदपत्र अपडेट करण्यासाठी ‘myAadhaar’ या पोर्टलवर १४ जून २०२६ पर्यंत मोफत सुविधा असेल. त्यानंतर तुम्हाला जे आधार अपडेट करायचे असेल तर एनरोलमेंट सेंटरला जाऊन अपडेट करावं लागेल आणि 75 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

तुम्ही ई-केवायसी किंवा दुसऱ्या टूल्सच्या मदतीने जर आधार प्रिंट काढणार असाल तर पहिल्या टप्प्यात ४० रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात ५० रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही नोंदणी केंद्रात जाऊन आधार अपडेट केले तर तुम्हाला GST सह ७०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. एकापेक्षा अधिक आधार नोंदवायचे असल्यास पहिल्या व्यक्तीचे ७०० रुपये आणि त्यानंतर ३५० रुपये आकारले जातील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!