आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात, नेमका फायदा काय होणार?

पुणे : आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक बॉण्डमुळे आयातदार व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून मागणी केली जात होती. यामुळे आता आता कागदी बॉण्डची झंझट संपणार आहे.

यामध्ये कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे अनेकदा फसवणूक होत असल्याचे समोर देखील आले होते. आता मात्र फसवणुकीसही आता आळा बसणार आहे. आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल. याबाबत आदेश दिले असल्याचे समोर आले आहे.
या निर्णयामुळे कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इलेक्ट्रॉनिक बॉण्डबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामुळे कायदेशीर मुद्रांक शुल्क थेट ऑनलाइन भरण्याची सोय होणार आहे. उद्योगक्षेत्रासाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे. व्यवहारातील खर्च व वेळ वाचणार तसेच कागदपत्रांची गुंतागुंत कमी होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कागदपत्रांची गुंतागुंत कमी होणार आहे.

दरम्यान, यामध्ये ई-बॉण्ड प्रणाली आणि यांच्या तांत्रिक सहकार्याने आयातदार व र्यातदारांसाठीची सीमाशुल्क प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ होणार आहे. सर्व प्रक्रिया वेगवान, सुरक्षित व पारदर्शक बनवण्यावर सरकारचा भर असणार आहे. तसेच या उपक्रमाअंतर्गत ई-स्टॅम्पिंग, ई-स्वाक्षरी, ऑनलाइन पेमेंट, रिअल टाइम पडताळणी, डिजिटल रेकॉर्ड्स यांचा वापर होणार
आहे.