मनसेतून बडतर्फ झालेल्या वैभव खेडकरांचा भाजप पक्षप्रवेश दोनदा रखडला, उदय सामंत म्हणाले, मी हमी देतो..


पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कोकणातील एकेकाळचे खंदे समर्थक आणि राज ठाकरे यांनी मनसेतून बडतर्फ केलेले वैभव खेडेकर यांचा तब्बल दोन वेळा रद्द झालेला भाजपप्रवेश राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून आता शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. खेडकर यांचा पक्षप्रवेश तीन वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो असं त्यांनी म्हटल आहे.

पुढे बोलताना सामंत म्हणाले, एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश हा तीन-तीन वेळा रद्द होणं हे खच्चीकरण केल्यासारखं आहे.खेडेकर समाजामध्ये तळागाळात जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व आहे. ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, पण त्यांचा पक्षप्रवेश तीन वेळा का रद्द झाला हे मला पण कळलेलं नाही. पण माझं एक राजकीय मत सांगतो, की अशा पद्धतीने पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे. ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे. पक्षप्रवेश तीन वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो असेही त्यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले, खेडकर यांच्यासारख्या समाजकार्य करणाऱ्या माणसाचा तीन-तीन वेळा पक्षप्रवेश रखडत असल्याने त्यांची राजकीय खच्चीकरण केले जात आहे असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कोकणात नव्या राजकीय चर्चांना आता उधाण आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!