मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या गोपनीयतेसाठी नवीन दंडक जाहीर ; प्रशासनाने काय निर्णय घेतला?


पुणे: राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीयता राखण्यासाठी आणि अनधिकृत अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी नवीन दंडक जाहीर करण्यात आल आहे. यामुळे मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर जाण्यावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.मंत्रिमंडळ बैठकीला यापुढे मंत्री, सचिव व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही अधिकाऱ्यास मुख्य सचिवांच्या परवानगीशिवाय उपस्थित राहता येणार नाही, असा दंडक जाहीर करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीयता राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच अधिकारी व मंत्र्यांना तंबी दिल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतील खडाजंगी बाहेर येणं काहीसं बंद झालं आहे.त्यानंतर आत्ता मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक आहे, अशा अधिकाऱ्यांची यादी यापुढे मुख्य सचिव कार्यालयाला कळवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहणाऱ्या आंगतुक अधिकाऱ्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत विविध विषयांबाबत होणारी चर्चा अत्यंत गोपनीय असते. मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीयता, पावित्र्य आणि महत्त्व अबाधित ठेवणं अत्यंत आवश्यक असत.मात्र काही मंत्री व अधिकारी माध्यमांना माहिती देत असल्याच्या संशयावरून हा प्रकारही मुख्यमंत्र्यांनी बंद करण्यास सांगितला होता.त्यानंतर आत्ता बैठकीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!