कोल्हापूर हादरलं! खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार करुन संपवलं…


कोलापूर : कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकल्यानंतर कोयत्याने गळ्यावर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

रोहिणी प्रशांत पाटील (वय २८) असे असेउण पती प्रशांत पाटील याने ही हत्याकेल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर फरार झालेल्या प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात प्रशांत पाटील आणि त्यांची पत्नी रोहिणी पाटील हे दाम्पत्य आपल्या दोन मुलींसह वास्तव्यास होते. आठ वर्षांपूर्वी प्रशांतचा विवाह वाळवा तालुक्यातील ढवळी गावातील रोहिणीशी झाला होता.

त्यांना सहा आणि तीन वर्षांच्या दोन मुली आहेत. प्रशांतचा गावी दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय असून, गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये वाद सुरु होते. दरम्यान, रोहिणीचे वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी येथे जात असे.

घटनेच्या दिवशी दुपारी प्रशांत आणि रोहिणी दोघे दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे परतत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वारणा नदीचा पूल ओलांडून गावाजवळील ओढ्याजवळ प्रशांतने दुचाकी थांबवली.

अचानक त्याने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले, रोहिणीने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, हातावर वार झेलले, पण अंधार आणि निर्मनुष्य ठिकाणामुळे तिला मदत मिळाली नाही. प्रशांतच्या सततच्या हल्ल्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्यानंतर तेथून भादोले येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही असे सांगून पळून गेला होता. या घटनेने गावात खळबळ उडाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!