पावसाचा हाहाकार! पुण्यासह ‘हे ‘जिल्हे संकटात, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा…

पुणे : राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे.आत्ता सहा जिल्हांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबई, ठाणे, पालघर, जालना आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह पुण्यातही आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे. पहाटे 3 वाजले पासून 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यामुळे अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, असे प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.
मराठवाड्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतांचं मोठं नुकसान झाल आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे दरम्यान कोकण, मराठवाडा, मुंबई आणि विदर्भात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
