मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद सोडणार? चर्चेवर दिलं स्वतः स्पष्टीकरण…

पुणे : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्ष कामाला लागले असून निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.अशातच राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिल आहे.’या पदाच्या शर्यतीत मी नाही. २०२९ पर्यंत मी राज्यातच काम करावं, अशी पक्षाची इच्छा आहे. मी पुढच्या काही वर्षांसाठीची राज्याच्या विकासाची योजना केंद्राला सादर केली आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बनवण्याची देखील चर्चा सुरू आहे.सध्या भारतीय जनता पार्टीकडे अध्यक्ष पदासाठी कोणताही चेहरा नाही. जेपी नड्डा यांचा कार्यकाल संपला आहे. ते हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. मात्र भाजप सध्या अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना संधी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आल आहे. मात्र आपण राज्यातच काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री पद सोडून कुठेही जाणार नाही, राज्यातच काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने अलीकडेच राज्यातील महानगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ च्या आधी घ्याव्यात असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत.
