निवडणुकीत धमाका ठरला! राहुल गांधीनंतर आदित्य ठाकरेंचं सर्जिकल स्ट्राइक वक्तव्य, म्हणाले…


पुणे : देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदान प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचे संकेत दिले होते. तसेच त्यांनी व्होटचोरीसारखा गंभीर मुद्दा उपस्थित करत लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार अशी टीका केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही थेट सर्जिकल स्ट्राइक करण्याचा इशारा देत निवडणुकीतील गोंधळाविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे स्पष्ट केल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राहुल गांधींच्या आरोपानंतर ठाकरे गटानेही निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “आम्हीही मतदारसंख्येत अचानक झालेल्या वाढीबाबत, गायब मतदारांबाबत आणि मतदान केंद्रांवरील गैरव्यवस्थेबाबत आयोगाला मागील वर्षीच पत्र लिहिलं होतं. या सर्व घोळांवर लवकरच पत्रकार परिषद घेणार असून सगळं काही लोकांसमोर मांडणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणुका दरम्यान मोठ्या प्रमाणात विसंगती आढळल्या आहेत. त्यावर अजूनही अभ्यास सुरू आहे. निकाल आम्ही मान्य केला. पण सध्याचं सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही. एक उपमुख्यमंत्री आपल्या गावात रडत बसतात, तर कधी दिल्लीत जाऊन तक्रारी करत असतात,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!