आयुष कोमकर हत्या प्रकरण अपडेट; कृष्णा आंदेकरला मदत करणाऱ्या टोळीवर हडपसरमध्ये मोठी कारवाई..

पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि आंदेकर टोळीचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. आता आयुषच्या हत्या प्रकरणात आंदेकरला मदत करणाऱ्या टोळीवर हडपसर मध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कृष्णा आंदेकर याला मदत करणारा पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार रिझवान उर्फ टिपू पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्या अनधिकृत बांधकामावर आज काळेपडळ पोलिस स्टेशन आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराच्या बेकायदेशीर कृत्यांवर आणि बांधकामावर कायदेशीर पद्धतीने आळा घालण्यात आला आहे. याच टोळीतील नंबरकारींनी सोमनाथ गायकवाडचा गेम करण्यासाठी मदत केली होती.
दरम्यान कृष्णा आदेकरला आयुष कोमकर हत्या प्रकरणात टिपू पठान टोळीने मदत केली होती.काळेपडळ पोलिस स्टेशनमध्ये टिपू पठाणवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल आहे. त्याच्या बेकायदेशीर व्यवसायांना नियंत्रित करण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता पुणे पोलिसांचा बुलडोझर पॅर्टन पाहायला मिळत आहे. या कारवाई वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
