ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला ; कारवर दगडफेक अन काठ्या मारल्या…

पुणे : ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञात तरुणानीं त्यांच्या कारवर दगडफेक करत काठ्या मारल्या आहेत.हल्ला करणारे कोण होते? त्यांची माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,लक्ष्मण हाके हे अहिल्यानगर जिल्ह्यात एका ठिकाणी सभेसाठी निघाले होते. ज्या कारमधून ते जात होते त्यांच्या कारवरच दगडफेक करत काठ्यानीं अज्ञाताच्या कडून हल्ला करण्यात आला. हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या पकडी बाहेर आहेत. लक्ष्मण हाके यांनी आजच्या सभेआधी सकाळी एक फेसबुक पोस्ट केलेली. जालन्याच्या सभेच्यावेळी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या एका सहकाऱ्याला अशीच मारहाण झाली होती.
फेसबुक पोस्टमध्ये लक्ष्मण हाके काय म्हणाले?

“मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही.
दरम्यान अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. पण मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.