पावसाचा कहर ;’ या ‘जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, पुढील 24 तास धोक्याचे


पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये रेड अलर्टसह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेड या भागात सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश काढले. नांदेड शहरातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात तळ्याचे स्वरूप. नागरिकांनी खबरदारी घेण्याच जिल्हा प्रशासनाने आवाहन केले.

दरम्यान सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. सिना- कोळेगाव धरणातून , खासापुरी आणि चांदणी प्रकल्पतून 75 हजार 817 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काळोखा पसरला आहे. दुसरीकडे पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!