इंदापूर तालुक्यातील सणसर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश निंबाळकर यांची बिनविरोध निवड…


भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सणसर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर गावात एकच जल्लोष करण्यात आला. इंदापूर तहसील ऑफिस याठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या निवडीसाठी रमेश निंबाळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली. सणसर हे गाव इंदापूर तालुक्यातील राजकीयदृष्टीने महत्वाचे गाव असून येथील विकास सोसायटीच्या सभासदांची संख्या देखील मोठी आहे.

तसेच या विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमार्फत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून शेतकऱ्यांसाठीच शेवटपर्यंत काम करणार असून शेतकऱ्यांना पीककर्ज तसेच इतर सरकारी योजनांच्या माध्यमातून व्यवसायासाठी सोसायटीद्वारे मदत करणार असल्याचे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले.

तसेच सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरून सर्व संचालक आणि जेष्ठ मंडळींना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी सर्व संचालक मंडळ, जेष्ठ नेतेमंडळी, सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!