बंडू आंदेकरचं धक्कादायक कांड समोर, पोलिसांनाही बसला धक्का..


पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात आयुष कोमकर नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती, बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर आयुषच्या हत्येचा आरोप आहे, या प्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील काही जणांना पोलीसांनी अटक केली आहे, आयुष कोमकर खून प्रकणात आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनाही या खुलाशामुळे धक्का बसला आहे.काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या खुनामागे बंडू आंदेकर आणि त्याची टोळी असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणात आंदेकर टोळीतील काहींना अटकही झाली आहे. तसेच पोलिस तपासात असं उघड झालं की, बंडू आंदेकर याचा मुलगा वनराज आंदेकर याची गेल्या वर्षी हत्या झाली होती. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर याने स्वतःच्या नातवाचं, म्हणजेच आयुष कोमकरचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.

दरम्यान, तपासादरम्यान आंदेकर टोळीच्या खंडणी व्यवसायाचा मोठा खुलासा झाला आहे. गेल्या दहा वर्षांत आंदेकर टोळीने पुण्यातून तब्बल वीस कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचं समोर आलं आहे. विशेषतः गणेश पेठ येथील मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून दरमहा १५ ते २० लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याची माहिती मिळाली आहे.

या कारवायांमध्ये बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज आंदेकर अशी संपूर्ण टोळी सामील असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून त्यांनी हा गैरव्यवसाय दशकभर सुरू ठेवला होता.

दरम्यान, दुसरीकडे पुण्यातील नाना पेठ भागात महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बंडू आंदेकरच्या अवैध बांधकामांवर हातोडा चालवला. आंदेकरचे फ्लेक्स काढून टाकण्यात आले, तर त्याच्या बँक खात्यांवरही कारवाई झाली आहे.

यावेळी तब्बल २७ बँक खाती पोलिसांना आढळून आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. ही सर्व खाती गोठवण्यात आली असून, अवैध संपत्तीचा तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!