मोठी बातमी! आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवी कारवाई ; ‘या’ दोन महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


पुणे : पुण्यातील नानापेठेत झालेल्या टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून उगम पावलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी तेरा आरोपींना ताब्यात घेतल आहे.आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवत आंदेकर कुटुंबाभोवती आपला फास आवळला असून कुटुंबातील दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता आयुष कोमकरच्या हत्येमागे महिलांचाही समावेश आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वर्षभरापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना ताब्यात घेतले आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सोनाली आंदेकर यांचादेखील सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यासह पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेला कृष्णा आंदेकर याची पत्नी प्रियांका आंदेकर यांनाही ताब्यात घेतलं आहे. महिलांनाही ताब्यात घेतलं असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत बरेच आरोपी समोर आले आहेत मात्र पोलिसांनी पहिल्याच दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आयुष कोमकरच्या हत्येमागचा मास्टरमाईंड नेमका कोण आहे? याचाही छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!