सर्वात मोठी बातमी! आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, मनोज जरांगे पाटलांनी केली घोषणा…


मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे, त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाज गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे.

हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या उपोषण आणि आंदोलनादरम्यान लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. या तीव्र आंदोलनानंतर सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला. त्यामुळे मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे. यानंतर लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

धाराशिव येथे झालेल्या बैठकीदरम्यान जरांगे पाटलांनी जाहीर केले की, मराठा समाजाचं मोठं अधिवेशन दिल्लीमध्ये होणार आहे. लवकरच याची तारीखही जाहीर केली जाणार असून देशभरातील मराठा समाज या अधिवेशनात एकत्र येणार आहे. राज्यातील यशानंतर आता राष्ट्रीय स्तरावर ताकद दाखवण्याची ही रणनीती असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करताच ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. “मराठ्यांना आमच्यामधून आरक्षण नको” अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!