राज्य सरकार अॅक्शन मोडवर ;’ या’ रेशन कार्डधारकांचा लाभ बंद होणार..


पुणे : शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या रेशन वाटप योजनेचा उद्देश गरीब व गरजू कुटुंबांच्या पोटापाण्याची सोय करणे हा आहे. मात्र या योजनेचा लाभ बोगस रेशनकार्डधारक घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘मिशन सुधार वर्क’ ही मोहीम सुरू केली असून, याअंतर्गत बोगस रेशनकार्ड थेट रद्द करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे.

रेशन कार्डबाबत शासनाने स्पष्ट केले आहे , रेशन वाटप योजनेमुळे गरीब व गरजू कुटुंबांना लाभ मिळतो.एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपू नये” हा उद्देश साध्य करण्यासाठी अन्नधान्याचे न्याय्य वितरण केले जाते. परंतु, काही सधन व्यक्तींनी तसेच बोगस लाभार्थ्यांनी गरीबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता कठोर कारवाई करून पारदर्शकता आणण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. याचा फटका आता बोगस रेशन कार्ड धारकांना बसणार आहे.

दरम्यान गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १,०७० रेशनकार्डची पडताळणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण १३,६६५ रेशनकार्डांची छाननी करण्यात येणार आहे. यामध्ये सधन, डुप्लिकेट व अपात्र लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार असून, फक्त खऱ्या गरजूंनाच धान्याचा लाभ मिळावा यावर प्रशासनाचा भर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!